• Home
  • knowledge of the week
  • games
  • downloads
  • learn more
  • Let's Buy
4 hands club
science club

knowledge of the week   (Marathi) 

चंद्र पृथ्वीचा एकमात्र नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्र आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वी व चंद्रामधील अंतर ३,८४,४०३ कि.मी. असून, हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या सुमारे ३० पट आहे. चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७४ कि.मी. आहे.[१] याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे व चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा घालण्याकरीता २७.३ दिवसांचा कालावधी लागतो. तसेच चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्यातील भौमितिक स्थानांमुळे दर २९.५ दिवसांनी चंद्राच्या कलांचे एक आवर्तन पूर्ण होते.
ज्या खगोलीय वस्तूवर माणसाने पाऊल ठेवले आहे, अशी चंद्र ही ही एकमेव खगोलीय वस्तू आहे सोव्हियत संघाचे लूना १ हे अंतराळयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून सुटून चंद्राच्या अतिशय जवळून जाणारी पहिली वस्तू आहे. लूना २ हे अंतराळयान सर्वप्रथम चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले. तसेच लूना ३ या यानाने चंद्राच्या दुसऱ्या बाजूची सर्वप्रथम छायाचित्रे घेतली. ही तिन्ही याने सोव्हियत संघाने १९५९ साली सोडली. १९६६ साली चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारे पहिले अंतराळयान हे लूना ९ होते; तसेच लूना १० ने चंद्राला सर्वप्रथम प्रदक्षिणा घातल्या.[१] ज्याद्वारे मनुष्याने चंद्रावर पाऊल ठेवले अशीअमेरिकेची अपोलो मोहीम ही जगातील आजवरची एकमेव मोहीम आहे

चंद्राच्या दोन बाजू[संपादन]चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएवढाच असल्यामुळे चंद्राची कायम एकच बाजू पृथ्वीच्या दिशेला असते. चंद्राच्या दुसऱ्या बाजूची छायाचित्रे ही सर्वप्रथम लूना ३ या अंतराळयानाने १९५९ साली घेतली.
पृथ्वीवरुन पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा एकूण ५९% इतका भाग पृथ्वीवरून दिसतो. पण एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त ५०% भागच पाहता येतो.


मारिया[संपादन]चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर असलेल्या डागांना ”मारिया” असे नाव आहे. हे नाव ”लॅटिन” भाषेतील ”मेअर” म्हणजे ”समुद्र” या शब्दाचे अनेकवचन आहे. पूर्वीचे खगोलशास्त्रज्ञ या डागांना पाण्याचे समुद्र समजत असत. आता मात्र हे डाग म्हणजे लाव्हा पासून बनलेले बसाल्ट खडक असल्याचा शोध लागलेला आहे. चंद्रावर धडकलेल्या उल्का तसेच धूमकेतू यांच्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे पडले. या खड्ड्यांमध्ये लाव्हा भरला गेल्याने चंद्राच्या पृष्ठभागावर डाग दिसतात.
चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूपैकी सुमारे ३१% भाग[१] हा मारिया डागांनी व्यापलेला आहे. तर पृथ्वीविरुद्ध बाजूवर फक्त २% एवढाच भाग या डागांनी व्यापलेला आहे.,[२] यामागील शास्त्रीय कारण म्हणजे चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर असणारे उष्णता निर्माण करणाऱ्या घटकांचे जास्त प्रमाण होय..[३][४]
चंद्राच्या पृष्ठभागावरील डागांचा भाग सोडला तर इतर भाग हा उंच पर्वतरांगानी व्यापलेला आहे. या पर्वतरांगा उल्का व धूमकेतूंच्या झालेल्या धडकांमुळे तयार झाल्या असाव्यात असे शास्त्रज्ञांना वाटते. पृथ्वीप्रमाणे अंतर्गत हालचालींमुळे तयार झालेल्या पर्वतरांगा चंद्रावर आढळत नाहीत.
१९९४ साली क्लेमेंटाईन अंतराळयानाने घेतलेल्या चंद्राच्या छायाचित्रांमध्ये असे दिसून आले की चंद्राच्या उत्तरध्रुवावरील ”पियरी विवराच्या” बाजूने असणाऱ्या चार मोठ्या पर्वतरांगांवर पूर्णवेळ प्रकाश असतो. चंद्राच्या अक्षातील छोट्याशा कलण्याने (१.५ अंश) या ठिकाणी कायम प्रकाश असतो. चंद्राच्या दक्षिणध्रुवाजवळ असणाऱ्या काही पर्वतरांगांवर दिवसाच्या ८०% वेळ सूर्यप्रकाश असतो.


चंद्रावरील विवरे[संपादन]
पृथ्वीविरुद्ध बाजूवर असणारे डिडॅलस विवरचंद्राच्या पृष्ठभागावर उल्का तसेच धूमकेतूंच्या धडकेने तयार झालेली अनेक विवरे दिसतात. यातील जवळजवळ पाच लाख विवरांचा व्यास हा १ कि.मी. पेक्षा जास्त आहे.[५]चंद्रावरील वातावरणाचा अभाव, तिथले हवामान व इतर खगोलीय घटनांमुळे ही विवरे पृथ्वीवरील विवरांपेक्षा सुस्थितीत आहेत.
चंद्रावरील सर्वांत मोठे विवर म्हणजे दक्षिण ध्रुवाजवळ असणारे एटकेन विवर होय. हे विवर संपूर्ण सूर्यमालेतील सर्वांत मोठे ज्ञात विवर आहे. हे विवर चंद्राच्या पृथ्वीविरुद्ध बाजूवर असून त्याचा व्यास सुमारे २,२४९ कि.मी. तर खोली सुमारे १३ कि.मी. आहे..[६] पॄथ्वीकडील बाजूवरील मोठी विवरे म्हणजे इंब्रियम, सेरेनिटटिस, क्रिसियम व नेक्टारिस.
रिगॉलिथ[संपादन]चंद्राच्या पृष्ठभागावर आढळणारी धूळ म्हणजे रिगॉलिथ. चंद्राच्या पृष्ठभागावर झालेल्या विविध आघातांमुळे ही धूळ तयार झालेली आहे. ही धूळ चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग एखाद्या चादरीप्रमाणे व्यापते व हिची जाडी मारियामध्ये ३-५ मी. तर इतरत्र १०-२० मी. इतकी आहे.[७]
पाण्याचे अस्तित्व[संपादन]असे मानले जाते की उल्का व धूमकेतू जेव्हा चंद्रावर आदळतात तेव्हा त्यांच्यातील पाण्याचा अंश हा चंद्रावर सोडतात. असे पाणी नंतर सूर्यप्रकाशामुळे विघटित होऊन ऑक्सिजन व हायड्रोजन हे वायू तयार होतात. चंद्राच्या अतिशय कमी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे वायू कालांतराने अवकाशात विलीन होतात. पण चंद्राचा अक्ष किंचित कललेला असल्याने चंद्राच्या ध्रुवप्रदेशावरील काही विवरे अशी आहेत की ज्यांच्या तळाशी कधीही सूर्यप्रकाश पोचत नाही. या ठिकाणी पाण्याचे रेणू आढळण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते.
क्लेमेंटाईन यानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील विवरांचा नकाशा बनविला असता[८] संगणकाच्या साहाय्याने केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे १४,००० चौरस कि.मी. इतक्या प्रदेशात कधीही सूर्यप्रकाश पोचत नाही असे अनुमान काढण्यात आलेले आहे.[९] क्लेमेंटाईन यानावरील रडारच्या साहाय्याने नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणांनुसार चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या बर्फापासून तयार झालेल्या छोट्या छोट्या भागांचे अनुमान निघते. तसेच स्पेक्ट्रोमीटरने नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार चंद्राच्या ध्रुवीय भागांमध्ये हायड्रोजन वायूचे जास्त प्रमाण असल्याचे दिसून येते.[१०] चंद्रावरील एकूण बर्फाचे प्रमाण हे सुमारे एक अब्ज घनमीटर (एक घन कि.मी.) असल्याचे अनुमान शास्त्रज्ञांनी काढलेले आहे.
हा पाण्याचा बर्फ खणून काढून अण्विक जनित्रे अथवा सौर उर्जेवर चालणाऱ्या विद्युत जनित्रांच्या साहाय्याने ऑक्सिजन व हायड्रोजन मध्ये रूपांतर करणे शक्य झाल्यास भविष्यात चंद्रावर वसाहती स्थापन करणे शक्य होईल. कारण पृथ्वीवरून पाण्याची वाहतूक करणे अतिशय किचकट व महागडे काम आहे. तरीसुद्धा सध्याच्या काही संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे क्लेमेंटाईनच्या रडार मध्ये दिसणारे बर्फाचे भाग हे बर्फ नसून नवीन विवरांमधून निघालेले खडक असण्याची शक्यता आहे.[११] त्यामुळेच चंद्रावर नक्की किती प्रमाणात पाणी आहे हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे.

div style="visibility:hidden"
Powered by Create your own unique website with customizable templates.